| कोकणकन्या एक्स्प्रेसच्या इंजिनची टाकी फुटली by Mafia on 18 May, 2013 - 09:00 PM | ||
|---|---|---|
Mafia | कोकणकन्या एक्स्प्रेसच्या इंजिनची टाकी फुटली on 18 May, 2013 - 09:00 PM | |
कोकणकन्या एक्स्प्रेसच्या इंजिनची टाकी फुटली मुंबईहून गोव्याकडे निघालेली कोकणकन्या एक्स्प्रेसच्या इंजिनाची डिझेल टाकी फुटल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. कणकवली- मुंबईहून गोव्याकडे निघालेली कोकणकन्या एक्स्प्रेसच्या इंजिनाची डिझेल टाकी फुटल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. त्यामुळे टाकीतील डिझेल खाली सांडल्याने इंजिन कणकवली स्थानकात येऊन बंद पडले. ही बाब बेळणे येथील गेटमनच्या लक्षात आल्याने त्यांनी प्रसंगवधानता दाखवत त्यांनी कणकवली रेल्वेस्थानकात याबाबतची माहिती दिली. त्यानंतर कणकवली स्थानकात ही गाडी थांबवली. यामुळे पुढील अनर्थ टळला. विलवडे स्थानकादरम्यानच्या मार्गाचे दुतर्फा काम सुरू असल्याने येथील मोठा दगड रेल्वेच्या इंजिनाच्या डिझेल टाकीवर आपटून टाकी फुटली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. इंजिनची टाकी फुटल्याने शेकडो लिटर डिझेल वाहून गेले. या दरम्यान रेल्वेचे वेळापत्रक चार तास विस्कळीत झाले होते. राजापूर ते कणकवली दरम्यान, डिझेल इंजिनला गळती लागून डिझेल रेल्वे मार्गावर सांडत गेले. या प्रकरणाची चौकशी मात्र रेल्वे प्रशासनाकडून होणार आहे. | ||