| मिल्क एक्स्प्रेसने दिल्लीला पुरवले दीड कोटी... by irmafia on 02 August, 2013 - 06:02 PM | ||
|---|---|---|
irmafia | मिल्क एक्स्प्रेसने दिल्लीला पुरवले दीड कोटी... on 02 August, 2013 - 06:02 PM | |
सोलापूर - मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातून पहिल्यांदाच सुरू झालेली दौंड ते दिल्ली या मिल्क एक्स्प्रेसला 30 जुलैला एक वर्ष पूर्ण होत आहे. वर्षभराच्या या कालावधीत या एक्स्प्रेसमधून सुमारे 3 कोटी 90 लाख लिटर दूध दिल्लीला पाठविण्यात आले. त्यात एक कोटी 40 लाख लिटर इतका निम्मा वाटा एकट्या सोलापूर जिल्ह्याचा आहे. तसेच, एक्स्प्रेसमुळे रेल्वेला 8 कोटी 67 लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. | ||