| ‘देवगिरी’चे इंजिन इगतपुरीत घसरले, by railgenie on 08 July, 2013 - 09:00 PM | ||
|---|---|---|
railgenie | ‘देवगिरी’चे इंजिन इगतपुरीत घसरले, on 08 July, 2013 - 09:00 PM | |
इगतपुरी - सिकंदराबादहून नांदेडमार्गे मुंबईला जाणा-या देवगिरी एक्स्प्रेसचे इंजिन इगतपुरीजवळ शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास घसरत सुमारे एक किमीपर्यंत पुढे गेले. या दुर्घटनेमुळे रेल्वे ट्रॅकला जवळपास 22 ठिकाणी तडे गेले. यानंतर मुंबईकडे जाणारी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. रुळ दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू होते. दुपारी काम पूर्ण होईपर्यंत मुंबईकडे जाणा-या गाड्या टिटोलीच्या यार्डातून संथगतीने वळवल्या होत्या. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. देवगिरी एक्स्प्रेसमधील प्रवाशांनी अन्य गाड्यांमार्फत मुंबई गाठली. या घटनेनंतर मुंबईकडे जाणा-या प्रवाशांची व चाकरमान्यांची मोठी तारांबळ उडाली होती. काहींनी कसारा स्थानक गाठून लोकलचा आधार घेतला. | ||