Indian Railways News => Topic started by riteshexpert on Jul 24, 2013 - 03:00:10 AM


Title - - भुसावळ-नागपूर रेल्वे वाहतूक ठप्प, प्रवाशांचे हाल -
Posted by : riteshexpert on Jul 24, 2013 - 03:00:10 AM

भुसावळ- वर्धा स्थानकाजवळ रेल्वे रुळाखालील भराव पावसामुळे वाहून गेला. यामुळे भुसावळकडून नागपूरकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली. शुक्रवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास झालेल्या या प्रकारामुळे मध्यरात्रीपासूनच प्रवाशांचे हाल झाले. शनिवारी तब्बल सात प्रवासी गाड्या रद्द झाल्याने गोंधळ वाढला होता.

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात वर्धानजीक शिंदी तुळजापूर स्थानक आहे. या स्थानक परिसरात 789 किलोमीटर खांबाजवळील रुळांखालील भराव पावसामुळे वाहून गेला. यामुळे नागपूर मार्गावरील वाहतूक बंद झाली. परिणामी रेल्वे प्रशासनाने भुसावळहून नागपूरकडे जाणार्‍या 18 गाड्यांचे मार्ग बदलवले. यापैकी 15 गाड्या खंडवा, इटारसीमार्गे तर तीन गाड्या मलकापूर, अकोला, बडनेरा, नारखेडमार्गे नागपूर येथे जात आहेत. मात्र, नागपूरला पोहोचल्यानंतर सर्व गाड्या नियमित मार्गावरून धावत आहेत.

शनिवारी डाऊन मार्गावरील महाराष्ट्र एक्स्प्रेस (1040), सीएसटी-नागपूर एक्स्प्रेस (12139), सीएसटी-नागपूर (12289), भुसावळ-नागपूर (51285), गरीब रथ (12113) या गाड्या रद्द करण्यात आल्या. तर अप मार्गावरील नागपूर-मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस (12140), नागपूर-पुणे एक्स्प्रेस (12136) यांचा समावेश आहे. रविवारी अप मार्गावरील नागपूर-वर्धा (51260) आणि नागपूर-भुसावळ (51286) या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. दरम्यान, दुरूस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याने मार्ग बदलवलेल्या गाड्या लवकरच नियोजित वेळापत्रकानुसार धावतील. मात्र, अचानक बदल झाल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

या गाड्यांचे मार्ग बदलले

डाऊन मार्ग : विदर्भ एक्स्प्रेस (12105), पुणे-विलासपूर (12850), आझाद हिंद एक्स्प्रेस (12129), हावडा व्हाया नागपूर मेल (12109), अहमदाबाद-पुरी एक्स्प्रेस (18406), शालीमार एक्स्प्रेस (18029), पोरबंदर-कवैनूर एक्स्प्रेस (12949), कुर्ला-भुवनेश्वर एक्स्प्रेस (12879) आणि ज्ञानेश्वरी एक्स्प्रेस (12101)

अप मार्ग : हावडा-अहमदाबाद (12834), सेवाग्राम एक्स्प्रेस (12140), ददिया-कुर्ला (12812), गीतांजली एक्स्प्रेस (12872), हावडा-मुंबई एक्स्प्रेस (12870), दुरांतो हावडा-पुणे एक्स्प्रेस (12290) या गाड्यांच्या मार्गात बदल झाला. या सर्व गाड्या खंडवा, इटारसीमार्गे नागपूरला पोहोचत आहेत.

'महाराष्ट्र'मुळे गोंधळ

शनिवारी सकाळी 9 वाजता भुसावळ स्थानकावर आलेली पुणे-गोंदिया महाराष्ट्र एक्स्प्रेस खंडवामार्गे जाईल, अशी उद्घोषणा झाली. प्रवाशांनी मात्र मलकापूर, अकोलामार्गेच गाडी सोडावी अशी मागणी केली. खंडवामार्गे जाण्यास विरोध झाल्याने ही गाडी अकोला, बडनेरा, नारखेडमार्गे सोडण्यात आली.