| Indian Railways News => | Topic started by railenquiry on Jul 21, 2013 - 09:00:26 AM |
Title - - भुसावळमध्ये साकारणार ‘रेलनीर’,Posted by : railenquiry on Jul 21, 2013 - 09:00:26 AM |
|
|
भुसावळ - रेल्वेच्या 2010 च्या अर्थसंकल्पात नाशिकसाठी जाहीर केलेला दोन कोटी रुपये खर्चाचा ‘रेलनीर’ प्रकल्प आता भुसावळमध्ये साकारणार आहे. प्रकल्पासाठी रेल्वेच्या कंटेनर विभागाजवळ दोन हजार चौरस मीटर जागेचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे सादर केला आहे. प्रकल्प सुरू झाल्यावर दररोज एक लाख पाण्याच्या बाटल्या येथे भरल्या जातील. |