Indian Railways News => Topic started by Mafia on Jul 09, 2013 - 18:00:52 PM


Title - ATVM'वर लांब पल्ल्याची तिकिटे
Posted by : Mafia on Jul 09, 2013 - 18:00:52 PM

मुंबई

मध्य रेल्वेने 'एटीव्हीएम'वर लोकल तिकिटांप्रमाणेच सर्वच मेल/एक्स्प्रेसची अनारक्षित (अनरिझर्व्ह) तिकिटे मिळण्याची सुविधा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी फक्त पुण्यापर्यंतच याप्रकारे अनारक्षित तिकिटे मिळण्याची व्यवस्था होती. मात्र देशभरातील कोणत्याही गाड्यांची अनारक्षित (जनरल क्लास) वर्गातील तिकिटे 'एटीव्हीएम'वर मिळतील. विशेष म्हणजे स्टेशनबाहेरील आरक्षण केंद्रांवरही याप्रकारे टप्प्याटप्प्याने तिकिटांची सुविधा पुरवण्यात येणार आहे