| Indian Railways News => | Topic started by puneetmafia on Jul 03, 2013 - 06:00:44 AM |
Title - Himalaya Ti train maintenance in Kurduwadi solapur - हिमालयाची राणी टॉयट्रेन सजतेय कुर्डुवाडीत !Posted by : puneetmafia on Jul 03, 2013 - 06:00:44 AM |
|
|
सोलापूर- जागतिक वारसा म्हणून गौरवलेल्या आणि हिमालयाची राणी म्हणून प्रसिद्ध असलेल्या दार्जिलिंग (पश्चिम बंगाल) येथे झुकझुक करत धावणार्या टॉयट्रेनच्या खास डब्यांची बांधणी आणि सजावट होते कुर्डुवाडीच्या रेल्वे वर्कशॉपमध्ये! उंचच पर्वतरांगा, गर्द धुक्यांनी आच्छादलेला रम्य परिसर, वृक्ष वेलीवर पावसाच्या पाण्यांचे पसरलेले दवबिंदू, डोंगरदर्या, कडेला गर्द हिरवळ, कोणालाही भुरळ पाडतील अशा सौंदर्यानी नटला आहे, तो दार्जिलिंग. निसर्गाने मुक्त हस्ते आपल्या सौंदर्याची मुक्त उधळण येथे केली आहे. याची मजा अधिक चांगल्या पद्धतीने लुटता यावी म्हणून 4 जुलै 1880 मध्ये येथे टॉयट्रेन सुरू झाली. आजही या विशेष रेल्वेची धडधड सुरू आहे. देशातील लोकप्रिय पर्यटनाचे ठिकाण म्हणून देशी-विदेशी पर्यटकांची पसंती दार्जिलिंगला आहे. पर्यटक येथील निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी येतात. हमखास टॉयट्रेनचा आनंद लुटतात. |