Indian Railways News => Topic started by puneetmafia on May 24, 2013 - 18:01:11 PM


Title - railway traffic standstill on kalyan karjat route
Posted by : puneetmafia on May 24, 2013 - 18:01:11 PM

मध्य रेल्वेवर विठ्ठलवाडी स्थानकाजवळ रेल्वेचा पेंटाग्राफ तुटल्याने कर्जत कल्याण मार्गावरील वाहतूक शुक्रवारी सकाळपासून ठप्प झालीये.
कल्याणकडून कर्जतकडे जाणारी आणि कर्जतकडून कल्याणकडे येणारी रेल्वे वाहतूक दुरुस्तीच्या कारणास्तव बंद करण्यात आली असल्याचे रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी ए. के. जैन यांनी सांगितले. दरम्यान, या दुरुस्तीकामामुळे पुणे-मुंबई मार्गावरील रेल्वे वाहतूकही ठप्प झाली. 
विठ्ठलवाडी स्थानकाजवळ रेल्वेचा पेंटाग्राफ तुटला. त्यानंतर रेल्वे वाहतूक धीम्यागतीने सुरू असल्याचे सांगण्यात येत होते.
मात्र, काहीवेळाने अंबरनाथ ते बदलापूर मार्गावर मध्य रेल्वेने तातडीचा मेगाब्लॉक घेतला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली.