Indian Railways News => Topic started by riteshexpert on Jul 11, 2013 - 21:00:57 PM


Title - कोल्हापूर 'जंक्शन'च्या दिशेने
Posted by : riteshexpert on Jul 11, 2013 - 21:00:57 PM

कोल्हापूर

कोल्हापूरला दक्षिण भारताशी रेल्वे कनेक्टिव्हिटीसाठी वाढविण्यासाठी आवश्यक असलेल्या कराड - बेळगाव रेल्वे मार्गाचा फिल्ड सर्व्हे पूर्ण झाला असून , ट्रॅफिक विभागाचाही सर्व्हे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे . या सर्व्हेचा एकत्रित अहवाल लवकरच रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात येणार आहे . त्याचबरोबर कोल्हापूर कोकण रेल्वेला जोडण्यासाठी आंबा तसेच गगनबावडा हे दोन पर्यायी मार्ग सुचवण्यात आले असून , त्याचाही सर्व्हे अंतिम टप्प्यात आहे .

औद्योगिक व व्यापार वाढीच्या दृष्टिकोनातून रेल्वे मार्गांच्या माध्यमातून कोल्हापूरची कोकण रेल्वेशी तसेच पूर्व किनारपट्टीशी कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी विविध मार्गांच्या पर्यायांची सातत्याने मागणी होत आली आहे . त्यातूनच कराड ते बेळगाव या १९१ किलोमीटर लांबीच्या सिंगल लेन मार्गाचा सर्व्हे रेल्वेच्या सिव्हिल इंजि ​ नीअरिंग विभागाने नुकताच पूर्ण केला आहे . ट्रॅफिक विभागाचा सर्व्हे अंतिम टप्प्यात आहे . सध्या कराड ते बेळगाव या दरम्यान रेल्वे प्रवासासाठी लागणारा वेळ या नवीन मार्गामुळे कमी होणार आहे . दोन महिन्यांत हा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात येणार आहे . कर्नाटक , महाराष्ट्र , गोवा या तीनही राज्यांना या मार्गाचा औद्योगिक व व्यापाराच्या दृष्टीने फायदा होऊ शकतो .

कोकण रेल्वेच्या राजापूर स्थानकाजवळ जाण्यासाठी कोल्हापुरातून दोन रेल्वे मार्गाचा सर्व्हे करण्यात येत आहे . त्यातील व्हाया आंबा घाट मार्ग १४५ किलोमीटरचा तर व्हाया गगनबावडा मार्ग १०५ ते ११० किलोमीटर अंतराचा आहे . दोन्ही मार्गांमध्ये जंगल व मोठे घाट असल्याने बोगदे व पूल बांधावे लागणार आहेत . दोन्ही मार्ग प्रस्तावित करण्यात येणार असले तरी त्यापैकी कमी अंतराचा व कमी खर्चाचा मार्ग रेल्वे बोर्डाकडे प्रस्तावित केला जाण्याची शक्यता आहे . राम नाईक यांच्यानंतर या परिसराची माहिती असलेले मल्लिकार्जुन खरगे सध्या रेल्वेमंत्री असल्याने या मार्गांना चालना मिळण्याची आशा निर्माण झाली आहे .

कराड ते बेळगाव प्रस्तावित मार्ग

कराड - इस्लामपूर - आष्टा - हातकणंगले - कागल एमआयडीसीजवळून निपाणीमार्गे - कणंगला - संकेश्वरमार्गे बेळगावजवळील सांबरा .