| टाळ्यांच्या कडकडाटात दख्खनच्या राणीचे स्वागत by railenquiry on 03 June, 2013 - 12:01 AM | ||
|---|---|---|
railenquiry | टाळ्यांच्या कडकडाटात दख्खनच्या राणीचे स्वागत on 03 June, 2013 - 12:01 AM | |
पुणे - रात्रीपासूनच पाना-फुलांनी नटलेली "ती' सर्वांना भेटायला उत्सुक होती. तिला भेटण्यासाठी आबालवृद्धांनी गर्दी केली होती. नेहमीच्या वेळेपेक्षा आज तीही जरा लवकरच आली. तिच्या भेटीसाठी आतुर झालेल्यांनी शिट्ट्या, टाळ्या अन् तिच्या नावाचा जयघोष करीत संपूर्ण रेल्वे स्थानक परिसर दणाणून सोडला. निमित्त होते अनेक वर्षांपासून पुणेकरांची सेवा करणारी "दख्खनच्या राणी' अर्थात "डेक्कन क्वीन'च्या 83 व्या वाढदिवसाचे! | ||