Indian Railways News => Topic started by puneetmafia on Jul 09, 2013 - 18:01:03 PM


Title - तिकीट केंद्र हाऊसफुल्ल
Posted by : puneetmafia on Jul 09, 2013 - 18:01:03 PM

मुंबई

गणरायाचे आगमन ९ सप्टेंबरला होत असल्याने आगाऊ आरक्षणासाठी सगळ्याच तिकीट केंद्रांवर गर्दी होत आहे. ६० दिवसांपूर्वी तिकीट काढण्याची सुविधा असल्याने संबंधित दिवशी केंद्र गर्दीने फुलून गेली आहेत. तिकीट मिळत नसल्याने वेटिंगचे तिकिटांनी हजाराचा आकडा पार केला आहे. स्लीपरचे वेटिंग तिकीट हजारपर्यंत आणि एसीचेही वेटिंग ३००-३५०पर्यंत पोहोचल्याचे पाहायला मिळते.

हंगामात खासगी बसेसची लूट आणि लांब पल्ल्यामुळे कोकण रेल्वे लोकप्रिय ठरली आहे. पण , दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकणातील गाड्यांची तिकिटे उपलब्ध नसल्याने प्रवासी बेजार झाले आहेत. तिकिटांसाठी ४-५ सप्टेंबरपासूनच गर्दी उसळली आहे. परंतु , सकाळी आठ वाजता तिकीट आरक्षण केंद्र उघडताक्षणी काही मिनिटांतच गाडी फुल्ल होत असल्याचा अनुभव येत आहे.

एका गाडीची किती तिकिटे मिळणार ?

एका एक्सप्रेसमध्ये सुमारे ८०० प्रवासी क्षमता असून त्यात तात्काळसह काही तिकिटांचा वेगळा कोटा असतो. अशातच , एकाच वेळी मुंबईसह राज्यातील विविध ठिकाणांहून तिकिटे काढण्यासाठी झुंबड उडाल्यास काही मिनिटांतच तिकिटे फुल्ल होतात. उन्हाळ्यात उत्तर भारतात जाणाऱ्या गाड्यांचीही अशीच स्थिती असते.