Indian Railways News => Topic started by nikhilndls on May 18, 2013 - 00:01:00 AM


Title - नागपूर-अजमेर विशेष गाडी
Posted by : nikhilndls on May 18, 2013 - 00:01:00 AM

नागपूर:
अजमेर येथील वार्षिक उर्सनिमित्त नागपूर-अजमेर-नागपूर ही विशेष गाडी सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. अजमेर-नागपूर ही विशेष गाडी १५ मे रोजी १९.३० वाजता अजमेरवरून सुटेल व १६ मे रोजी १६.४० वाजता नागपूरला पोहचेल. नागपूर-अजमेर ही विशेष गाडी १६ मे रोजी १९.१५ वाजता नागपूरवरून सुटेल व १७ मे रोजी १८.१५ वाजता अजमेर येथे पोहचेल. या गाडील १८ कोचेस असून, यात १ प्रथम सह द्वितीय वातानुकूलित, १ द्वितीय वातानुकूलित, १ तृतीय वातानुकूलित, ८ शयनयान, ६ द्वितीय श्रेणी अनारक्षित कोच व २ एसएलआर कोच राहतील. इटारसी, भोपाळ, नागदा, सवाई माधोपूर येथे या गाडीला थांबा देण्यात आला आहे.