Indian Railways News => Topic started by ConfirmTicket on Jul 24, 2013 - 03:00:03 AM


Title - नागपूरला जाणार्‍या काही प्रवासी रेल्वेगाड्या रद्द
Posted by : ConfirmTicket on Jul 24, 2013 - 03:00:03 AM

नाशिक- मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेचा मुंबई - नागपूर रेल्वेमार्गावर रूळाखालील स्लिपर आणि खडी वाहून गेल्याने हा मार्ग बंद झाला होता. त्यामुळे या मार्गावरून धावणार्‍या रेल्वेगाड्या बंद करण्यात आल्या. रेल्वेची ही सेवा पूर्ववत करण्यासाठी सुमारे चाळीस तास लागणार असल्याने दुसर्‍या दिवशी रविवारीही प्रवासी गाड्या रद्द करण्यात आल्या, तर काही गाड्यांचा मार्ग बदलण्यात आला होता. मुंबईहून भुसावळकडे जाणारी गीतांजली एक्स्प्रेस तब्बल सात उशिरा धावत होती, तर पावसामुळे हावडा- मुंबई दीड तास आणि हटिया एक्स्प्रेस सुमारे चार तासाने उशिरा धावत होत्या.

नागपूर - मुंबई रेल्वेमार्ग बंद झाल्याने नाशिकरोड येथील प्रवाशांची गैरसोय झाली. नागपूरकडे जाणार्‍या सेवाग्राम, नंदीग्राम या प्रवासी गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. विदर्भ एक्स्प्रेस, हावडा, हावडा मेल, हावडा एक्स्प्रेस या प्रवासी गाड्या वडनेरा-नरखेडामार्गे पुढे गेल्या. त्यामुळे काही प्रवाशांनी या मार्गे जाणे पसंत केले, तर अनेक प्रवाशांनी आपले तिकीट रद्द करून प्रवास रद्द केला. मुंबई- नागपूर मार्ग सुरू होण्यासाठी 40 तासांचा मेगाब्लॉक टाकण्यात आला होता. त्यामुळे उद्यापासून काही रेल्वे सुरू होण्याची शक्यता असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.