Indian Railways News => Topic started by messanger on Jul 12, 2013 - 03:00:05 AM


Title - पश्चिम रेल्वे विस्कळीत..
Posted by : messanger on Jul 12, 2013 - 03:00:05 AM

लोअर परळ आणि एल्फिस्टंट रोड दरम्यान अप धिम्या मार्गावरील ओव्हर हेड वायरमध्ये झालेल्या तांत्रीक बिघाडामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक साधारणता एक तास विस्कळीत झाली होती.
मुंबई- लोअर परळ आणि एल्फिस्टंट रोड दरम्यान अप धिम्या मार्गावरील ओव्हर हेड वायरमध्ये झालेल्या तांत्रीक बिघाडामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक साधारणता एक तास विस्कळीत झाली होती. संध्याकाळी चार वाजता हा बिघाड झाला. त्यानंतर एक तासाने हा बिघाड दुरूस्त करण्यात आला.
या कालावधीत धिम्या अप मार्गावरील लोकल जलद अप मार्गावर वळवण्यात आल्या. सात लोकल रद्द करण्यात आल्या. दरम्यान त्यानंतर पश्चिम रेल्वेची वाहतूक जवळपास पंधरा ते वीस मिनिटे उशीराने सुरू होती. त्यामुळे गाडय़ांमध्ये गर्दीही दिसून येत होती.