Indian Railways News => Topic started by railenquiry on Jul 14, 2013 - 21:00:03 PM


Title - पुरी-शिर्डीदरम्यान ८ विशेष गाड्या
Posted by : railenquiry on Jul 14, 2013 - 21:00:03 PM

नागपूर

प्रवाशांची गर्दी लक्षात घेता पुरी - साईनगर शिर्डी - पुरीदरम्यान नागपूरमार्गे ८ विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत .

०२७४६ पुरी - साईनगर शिर्डी ही विशेष गाडी १२ जुलै ते २ ऑगस्ट दरम्यान दर शुक्रवारी पुरीवरून २२ . १५ वाजता सुटेल व तिसऱ्या दिवशी सकाळी ८ . २५ वाजता साईनगर शिर्डी येथे पोहचेल . ही गाडी १३ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान दर शनिवारी नागपूरवरून १९ . ५० वाजता , तर वर्धा येथून २० . ५५ वाजता सुटेल . ०२७४५ साईनगर शिर्डी - पुरी ही विशेष गाडी १४ जुलै ते ४ ऑगस्ट दरम्यान दर रविवारी १३ . ०० वाजता साईनगर शिर्डीवरून सुटेल व दुसऱ्या दिवशी सोमवारी २३ . ०० वाजता पुरी येथे पोहचेल . ही विशेष गाडी १५ जुलै ते ५ ऑगस्ट दरम्यान दर सोमवारी वर्धेवरून ०० . १७ वाजता , तर नागपूरवरून रात्री १ . ५५ वाजता सुटेल . या गाडीला मनमाड , भुसावळ , बडनेरा , वर्धा , नागपूर , गोंदिया , दुर्ग , रायपूर , महासमुन्द , करियार रोड , कान्ताबांजी , तितलागढ , बोलंगगीर , बारगर रोड , संभलपूर , अंगुल , तालचेर रोड , ढिंकनाल , भूवनेश्वर , खुर्दा रोड या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे . या गाडीला एकूण २० कोचेस आहेत . यात १ द्वितीय वातानुकूलित , २ तृतीय वातानुकूलित , ९ शयनयान , ६ साधारण द्वितीय श्रेणी व २ एसएलआर कोच आहेत .