Indian Railways News => Topic started by Mafia on May 14, 2013 - 06:00:07 AM


Title - फुकट्या प्रवाशांकडून सव्वादोन लाखांची वसुली
Posted by : Mafia on May 14, 2013 - 06:00:07 AM

चेहेडी - सध्या उन्हाळाची सुटी आणि लग्नसराईचे दिवस असल्याने मध्ये रेल्वेच्या रेल्वे गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. या तुडुंब गर्दीचा फायदा घेऊन मोठ्या प्रमाणावर फुकटे प्रवास करीत असतात. अशाच मध्ये रेल्वेच्या विनातिकीट प्रवास करणारा प्रवाशांकडून प्रधान तिकीट निरीक्षक मगनदास शिंदे यांनी 8 तारखेला एकाच दिवसात दोन लाख 15 हजार 276 रुपयांची दंड वसुली केली, तसेच एप्रिल महिन्यात 15 लाख 28 हजार 950 रुपयांच्या दंड वसूल केला.

याबाबत माहिती अशी, की मध्य रेल्वे उड्डाण दस्त पथकांचे प्रधान तिकीट निरीक्षक मगनदास शिंदे यांनी 8 तारखेला एकाच दिवसांत 370 विनातिकीट तथा अनियमित यात्रा करणारे, मध्ये रेल्वे प्रवास करणाऱ्यांकडून दोन लाख 15 हजार 376 रुपये दंड वसूल केला. एकाच दिवसात दोन वेगवेगळ्या छत्रपती शिवाजी ट्रमर्निस ते नाशिक रोडदरम्यान प्रवाशांची त्यांनी तपासणी केली असता, 370 प्रवासी विनातिकीट प्रवास करीत असल्याचे निदर्शनास आले, तसेच मागील महिन्यात एप्रिलमध्ये दोन हजार 604 प्रवाशांकडून 15 लाख 28 हजार 950 रुपये त्यांनी केली दंड वसुली केली. सध्या उन्हाळ्याची सुटी आणि लग्नसराईचे दिवस असल्याने मध्ये रेल्वेच्या रेल्वे गाड्यांत मोठ्या प्रमाणात गर्दी असते. या गर्दीचा फायदा उठवत मोठ्या प्रमाणावर फुकटे प्रवास करतात.