Indian Railways News => Topic started by nikhilndls on Jul 01, 2012 - 04:00:03 AM


Title - मध्य रेल्वेवर धावणार दहा नव्या एक्‍स्प्रेस
Posted by : nikhilndls on Jul 01, 2012 - 04:00:03 AM

मुंबई - मध्य लोहमार्गावर लांब पल्ल्याच्या 10 नवीन एक्‍स्प्रेस गाड्या सुरू करण्यात येणार आहेत. यामध्ये अमरावती-पुणे द्विसाप्ताहिक, साईनगर शिर्डी-पंढरपूर त्रिसाप्ताहिक व कोकण लोहमार्गावरून जाणारी दादर-तिरुनवेल्ली या गाड्यांचा समावेश आहे. लवकरच या गाड्या प्रवाशांच्या सेवेत असतील; याशिवाय काही गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे.

रेल्वे अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने रोड मॅप आखला आहे. त्यानुसार जुलैपासून सुमारे सात महिन्यांत या रेल्वेगाड्या टप्प्याटप्प्याने सुरू केल्या जाणार आहेत.

तत्काळच्या प्रतीक्षा यादीवरील प्रवाशांना खात्रीशीर तिकीट उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात आलेल्या "मागेल त्याला तिकीट' योजनेत 14 मेल, एक्‍स्प्रेस गाड्यांचा समावेश करण्यात आला आहे. प्रवाशांना गाडी सुटेपर्यंत आरक्षण उपलब्ध होईल, असे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुबोध जैन यांनी सांगितले.

नवीन रेल्वेगाड्या

कामख्या-लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर-तिरुनवेल्ली व्हाया रोहा, विशाखापट्टणम-साईनगर शिर्डी, इंदूर-यशवंतपूर एक्‍स्प्रेस साप्ताहिक व्हाया नरखेड-अमरावती-अकोला, अमरावती-पुणे द्विसाप्ताहिक व्हाया अकोला-पूर्णा-लातूर, साईनगर शिर्डी-पंढरपूर एक्‍स्प्रेस त्रिसाप्ताहिक व्हाया कुर्डुवाडी, सोलापूर-यशवंतपूर त्रिसाप्ताहिक व्हाया गुलबर्गा, नागपूर-सिकंदराबाद त्रिसाप्ताहिक, साईनगर शिर्डी-म्हैसूर साप्ताहिक, लोकमान्य टिळक टर्मिनस-विशाखापट्टणम साप्ताहिक या गाड्यांचा समावेश आहे.

जुलैपासून

- मनमाड-पुणे एक्‍स्प्रेस 1 जुलैपासून भुसावळपर्यंत चालविण्यात येईल.

- कर्जत-पनवेल विभागातील चौक, महापे व चिखली ही नवीन स्थानके प्रवाशांसाठी खुली.

- मुंबई-पुणे इंटरसिटीला शिवाजीनगर येथे थांबा.

- मनमाड राज्य राणी एक्‍स्प्रेस ठाण्यात थांबणार.

- मुंबई-औरंगाबाद व मुंबई-मडगाव जनशताब्दी एक्‍स्प्रेस सीएसटीऐवजी दादर स्थानकातून सुटणार.

- औरंगाबाद व मडगाव जनशताब्दी गाड्यांचे डबे वाढविणार.