| महिलांच्या डब्यातून प्रवास करणाऱ्यांवर कारवाई by AllIsWell on 13 July, 2013 - 03:00 AM | ||
|---|---|---|
AllIsWell | महिलांच्या डब्यातून प्रवास करणाऱ्यांवर कारवाई on 13 July, 2013 - 03:00 AM | |
मुंबई- अपंग आणि महिलांच्या डब्यातून विनातिकीट प्रवास करणे पोलिसांना भोवणार आहे. रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) अशा पोलिसांवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. या कारवाईअंतर्गत मुंबई सेंट्रल रेल्वेस्थानकात अपंगांच्या डब्यातून प्रवास करणारे चार पोलिस आणि आठ प्रवासी अशा 12 जणांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईसंबंधीची माहिती संबंधित पोलिसांच्या वरिष्ठांनाही कळविली जाणार आहे. | ||