Indian Railways News => Topic started by railenquiry on Jul 04, 2013 - 15:01:49 PM


Title - मोबाइलवरून आरक्षणाला प्रतिसाद
Posted by : railenquiry on Jul 04, 2013 - 15:01:49 PM

नागपूर

मोबाइलद्वारे रेल्वे आरक्षणाची सोय १ जुलैपासून रेल्वे प्रशासनाने उपलब्ध करून दिली आहे . या आरक्षणाला प्रतिसाद मिळत असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले .
यासाठी प्रवाशांना आपला मोबाइल नंबर तसेच बँक खाते क्रमांक यांची नोंदणी आयआरसीटीसीकडे ( इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन ) करावी लागेल . संबंधित प्रवाशाला बँक मोबाइल मनी आयडेंटिफियर तसेच वनटाइम पासवर्ड देईल . तिकिटाचे पैसे भरण्यासाठी हे आवश्यक आहे . मोबाइलवरून आरक्षण करताना मेसेज बॉक्समध्ये गाडी क्रमांक , जिथे जायचे ते स्टेशन , प्रवासाची तारीख , प्रवाशांचे नाव , वय व लिंग लिहून तो मॅसेज आयआरसीटीसीने दिलेल्या नंबरवर पाठवायचा आहे . नियमानुसार सफल बुकिंग तिकीटचा मॅसेज आपल्या मोबाइलवर येईल . आयआरटीसीद्वारे मिळालेल्या या मेसेजसह प्रवास करताना आपले मूळ ओळखपत्र सोबत ठेवावे लागेल . मोबाइल मेसेजच्या माध्यमातून प्रवाशी आपले तिकीट रद्दही करू शकतात . मात्र , या योजनेत सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळात मोबाइल मेसेजद्वारे तिकीट बुकिंग करता येणार नाही , असे दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने कळविले आहे . अधिक माहिती आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर मिळू शकेल .