Indian Railways News => Topic started by nikhilndls on Jun 15, 2013 - 15:31:00 PM


Title - रेल्वे आरक्षण करा आठ वाजेपर्यंत
Posted by : nikhilndls on Jun 15, 2013 - 15:31:00 PM

पुणे

सुटीच्या दिवशी रेल्वेच्या प्रवाशांना आरक्षण करता यावे , म्हणून मध्य रेल्वेने पुणे स्टेशनवर रात्री आठ वाजेपर्यंत आरक्षण सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे . येत्या १६ जूनपासून ही सुविधा सुरू होईल . तिकीट आरक्षणाची सुविधा रविवारी सकाळी आठ ते दुपारी दोन या वेळेत उपलब्ध होती . त्यामुळे अनेक प्रवाशांची गैरसोय होत असे . आता रेल्वे प्रशासनाकडून पुणे स्टेशनवरील २८ , २९ आणि ३० या तीन आरक्षण खिडक्या दुपारी दोन ते रात्री आठ वाजेपर्यंत उघड्या ठेवण्यात येणार आहेत . त्यामुळे प्रवाशांना सुटीच्या दिवशी आरक्षण करता येणार आहे .