| Indian Railways News => | Topic started by messanger on Aug 02, 2013 - 15:01:39 PM |
Title - रेल्वे प्रवाशांची ‘अडचण’ सुटणार लवकरचPosted by : messanger on Aug 02, 2013 - 15:01:39 PM |
|
|
सोलापूर - अनेक प्रवासी रेल्वेचे आरक्षित तिकीट काढण्यासाठी स्थानकावरील आरक्षण केंद्रात जातात. त्यासाठी ते आपला वेळ व पैसा दोन्ही खर्ची घालतात. प्रवाशांना आपल्या घराच्या परिसरातच रेल्वेचे आरक्षित तिकीट काढता यावे, म्हणून सोलापूर रेल्वे प्रशासनाने फिरते आरक्षण केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्याप्रमाणे बुधवारी ती मोबाइल व्हॅन सोलापूर रेल्वे विभागात दाखल झाली. ही योजना येत्या काही दिवसांत प्रत्यक्ष सुरू होणार आहे. |