Indian Railways News => Topic started by nikhilndls on May 09, 2013 - 00:00:39 AM


Title - रेल्वे स्टेशनवर होणार चौथा प्लॅटफॉर्म
Posted by : nikhilndls on May 09, 2013 - 00:00:39 AM

नाशिकरोड

आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशिकरोड रेल्वेस्टेशनच्या विकासासाठी प्रयत्न सुरू झाले असून स्टेशनवरील चौथ्या प्लॅटफॉर्मच्या निर्मितीसाठी अधिकाऱ्यांकडून जागेची पहाणी करण्यात आली आहे . याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता असून चौथ्या प्लॅटफॉर्ममुळे नाशिकरोड रेल्वे स्टेशनचे महत्त्व वाढणार आहे .

नाशिकरोडच्या विभागीय महसूल कार्यालयात आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूम ‌ िवर नाशिक विभागातल्या व जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आयुक्त रविंद्र जाधव यांच्या दालनात नुकतीच झाली . यावेळी रेल्वे स्टेशनवरील चौथ्या प्लॅटफॉर्मच्या निर्मितीबाबत चर्चा व प्रत्यक्ष जागेची पहाणी करण्यात आली .
सिंहस्थाच्या दृष्टीने विभागीय कार्यालयातील बैठकीत रेल्वे स्टेशवरील सुधारणांबाबत चर्चा करण्यात आली . यावेळी विविध खात्याचे पदाधिकारी उपस्थित होते . लवकरात लवकर रेल्वेच्या कामांची आखणी करण्यात यावी व प्रत्यक्षात कामाला सुरुवात करावी असा सुर या बैठकीत निघाला . त्याकरीता प्रत्यक्ष जागेची पहाणी करुन कामांचा अहवाल सादर करण्याचे ठरले . त्यानुसार अधिकाऱ्यांनी मालधक्का रोडवरील जागेची पहाणी केली . तसेच गुड शेड शेजारील जागेवर बांधण्यात येणाऱ्या चौथ्या प्लॅट फॉर्मबाबत विचार विनिमय करण्यात आला . यावेळी विविध खात्याच्या प्रमुखांना रेल्वेच्या सुधारणाबाबतचा अहवाल तयार करण्याचे सांगण्यात आले असून हा अहवाल महसूल आयुक्त रविंद्र जाधव यांच्याकडे सुपूर्त केला जाणार आहे . आयुक्तांच्या आदेशानुसार त्या अहवालावर कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले . यावेळी बांधकाम विभाग , नाशिक महापालिका उपायुक्त , पोलिस विभाग , रेल्वच्या भुसावळ डिव्हीजनचे अधिकारी तसेच रेल परिषदेचे बिपीन गांधी उपस्थित होते .