Indian Railways News => Topic started by riteshexpert on May 15, 2013 - 00:00:29 AM


Title - लालूंच्या रॅलीसाठी 13 रेल्वे आरक्षित
Posted by : riteshexpert on May 15, 2013 - 00:00:29 AM

पाटणा- राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्या परिवर्तन रॅलीत सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांना आणण्यासाठी त्यांच्या पक्षाने चक्क 13 प्रवासी रेल्वे आरक्षित केल्या आहेत. उद्या (बुधवार) पाटणा येथे ही रॅली आयोजित करण्यात आली आहे.

यासंदर्भात मध्यपूर्व रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अमिताभ प्रभाकर म्हणाले, की लालू प्रसाद यादव यांच्या रॅलीसाठी बिहार आणि झारखंड येथील वेगवेगळ्या ठिकाणांपासून 13 प्रवासी रेल्वे आरक्षित करण्यात आल्या आहेत. या साठी रेल्वेला 1.11 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम प्राप्त झाली आहे. भारतीय रेल्वेचा रॅलीशी संबंध नाही. परंतु, रॅलीमुळे रेल्वेच्या उत्पन्नात निश्‍चितच भर पडली आहे.

2005 मध्ये राज्यातील सत्ता हातातून गेल्यानंतर राष्ट्रीय जनता दलाने प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात रॅलीचे आयोजन केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राजकीय हेतू समोर ठेवून रॅली आयोजित करण्यात आली असावी असे राजकीय विश्‍लेषकांनी सांगितले आहे.