Indian Railways News => Topic started by nikhilndls on Jul 02, 2013 - 20:00:03 PM


Title - लोकल बंद पडून प. रे.चा खोळंबा
Posted by : nikhilndls on Jul 02, 2013 - 20:00:03 PM

मुंबई - चर्चगेटला जाणारी लोकल तांत्रिक बिघाडामुळे अंधेरी स्थानकात बंद पडल्याने आज दुपारी पश्‍चिम रेल्वेची वाहतूक कोलमडली. या गोंधळामुळे गाड्या नियोजित वेळेपेक्षा 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत होत्या.

अप स्लो मार्गावरील ही लोकल अंधेरी स्थानकात आल्यानंतर दुपारी 1.25 च्या सुमारास बंद पडली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. स्लो मार्गावरून चर्चगेटला जाणाऱ्या लोकल खोळंबल्या होत्या. रेल्वेच्या दुरुस्ती पथकाने अर्ध्या तासानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी मोकळा केला. दरम्यानच्या काळात अप स्लो मार्गावरील लोकल अप जलद मार्गावरून चालविण्यात आल्या. त्यामुळे वाहतुकीचे वेळापत्रक विस्कळित झाले. लोकल नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावत होत्या. त्याचा फटका प्रवाशांना बसला.