| Indian Railways News => | Topic started by puneetmafia on May 29, 2013 - 06:00:54 AM |
Title - सीएसटी स्थानकाचे पोस्ट पाकीट प्रकाशितPosted by : puneetmafia on May 29, 2013 - 06:00:54 AM |
|
|
मुंबई – सीएसटी स्थानकाला १२५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सीएसटी स्थानकाचे छायाचित्र असलेल्या पोस्ट पाकिटाचे सोमवारी अनावरण करण्यात आले. यावेळी मुख्य पोस्ट मास्टर जनरल के. सी. मिश्रा, मध्य रेल्वेचे अतिरिक्त महाव्यवस्थापक डब्यू. के. प्रधान उपस्थित होते. सीएसटीची इमारत ही एक ऐतिहासिक वास्तू आहे. या इमारतीला १२५ वर्षे पूर्ण होत आहे. त्यामुळे एक प्रकारे या वास्तूचा सन्मानच या मध्यमातून केल्याचे रेल्वे प्रशासनाकडून या वेळी सांगण्यात आले. या माध्यमातून ही वास्तू आणखी लोकापर्यंत पोहोचेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला. भारतीय रेल्वेच्या इतिहास जीवंत करण्याचा हा प्रयत्न असल्याचे टपाल विभागाकडून सांगण्यात आले. |