Indian Railways News => Topic started by nikhilndls on Aug 04, 2012 - 20:19:51 PM


Title - eSakal - पुणे-लोणावळा लोकलमध्ये पुन्हा बदल
Posted by : nikhilndls on Aug 04, 2012 - 20:19:51 PM

पुणे - पुणे ते लोणावळा लोकलच्या वेळेत मध्य रेल्वेने पुन्हा एकदा बदल केला आहे. हा बदल शनिवारपासून लागू होणार आहे. प्रवाशांच्या मागणीमुळे बदल केल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

शिवाजीनगर स्थानकातून काही लोकल सोडल्या जात असून, लोकलच्या फेऱ्या 44 पर्यंत पोचल्या आहेत. यापूर्वी नवीन बदलात एकदा बदल केला गेला होता.

पुणे रेल्वे स्थानकावरून सोडण्यात येणाऱ्या लोकल पुढीलप्रमाणे : सायंकाळी 5.10, सायं. 6.02, सायं. 7.05, रात्री 8 , रात्री 8.35 (शिवाजीनगर स्थानकावरून सुटेल), रात्री 9.05, रात्री 10.10 आणि रात्री 11 वाजता सुटणारी लोकल तळेगावपर्यंत धावेल.

लोणावळा येथून सोडण्यात येणाऱ्या लोकल : सायं. 5.55, सायं. 6.40 (शिवाजीनगर स्थानकापर्यंत), सायं. 7.35, रात्री 8.40, रात्री 9.35, रात्री 10.05, रात्री 10.35 आणि रात्री 11.45.