Indian Railways News => Topic started by nikhilndls on Sep 22, 2012 - 18:00:13 PM


Title - चर्चगेट-विरार, सीएसटी-कल्याण एलिव्हेटेड रेल्वे!
Posted by : nikhilndls on Sep 22, 2012 - 18:00:13 PM

चर्चगेट-विरार, सीएसटी-कल्याण एलिव्हेटेड रेल्वे!
(22-09-2012 : 05:11:57) 

श्रीनारायण तिवारी। दि. २१ (मुंबई)
सीएसटी ते कल्याण आणि चर्चगेट ते विरार हा लोकल प्रवास आता लवकरच सुखकर होणार आहे. मुंबईत होणार्‍या एलिव्हेटेड रेल्वे प्रकल्पाला पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी मंजुरी दिली. यासाठी ५0 हजार कोटी रुपये खर्च येणार आहे.
या प्रकल्पानुसार चर्चगेट ते विरार आणि सीएसटी ते कल्याणपर्यंत रेल्वे ट्रॅकच्या वरून ही एलिव्हेटेड रेल्वे जाईल. त्यामुळे प्रवाशांचा वेळ तर वाचेलच व प्रवासही सुखकर होईल.
याबाबत केंद्रीय राज्यमंत्री आणि काँग्रेसचे खासदार गुरुदास कामत यांनी सांगितले की, हा प्रकल्प मंजूर करावा आणि त्यासाठी खर्चाचीही तरतूद करण्यात यावी, अशी मागणी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्याकडे करण्यात आली होती. मुंबई दौर्‍यावर आल्यानंतर पंतप्रधानांनी या प्रकल्पाला तत्त्वत: मंजुरी दिली होती. तसेच काही दिवसांपूर्वीच पश्‍चिम रेल्वेच्या मुख्यालयात महाप्रबंधक महेशकुमार यांच्यासोबत खासदारांच्या झालेल्या बैठकीत कुमार यांनी या प्रकल्पा मंजुरी मिळाल्याची माहिती दिली.

चर्चगेट ते विरार या एलिव्हेटेड रेल्वे कॉरिडोर प्रकल्पाला पंतप्रधान कार्यालयाकडून मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पाला १८ ते २0 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्प झाल्यास प्रवास सुखकर होईल.
- महेश कुमार,
महाप्रबंधक, मध्य रेल्वे

स्वप्न एलिव्हेटेड कॉरिडोरचे..
मुंबईकरांचा प्रवास होणार सोपा

चर्चगेट ते विरार या एलिव्हेटेड कॉरिडोर सेवेला पंतप्रधान कार्यालयाकडून अखेर मंजुरी मिळाली. त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास लवकरच सोपा आणि आरामदायी होणार आहे. या प्रकल्पाला तब्बल १८ ते २0 हजार कोटी रुपये खर्च येण्याची शक्यता आहे. लोकल आणि रस्ते वाहतुकीला संलग्न
अशी ही सेवा असेल.

सुशांत मोरे। दि. २१ (मुंबई)
रेल्वे प्रवाशांची वाढत जाणारी संख्या आणि त्यामुळे अवघड होत चाललेला प्रवास पाहता एक वेगळा स्वतंत्र रेल्वे मार्ग उभारता येईल का याची चाचपणी रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत होती. त्यासाठी रस्ते आणि लोकलशी संलग्न असा एलिव्हेटेड रेल्वे कॉरिडोर प्रकल्प उभारण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला. त्यानुसार चर्चगेट ते विरार असा ६0 किलोमीटरचा एलिव्हेटेड रेल्वे प्रकल्प तयार करण्यात आला.
या प्रकल्पाला मंजुरी मिळावी म्हणून स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पश्‍चिम रेल्वे प्रशासनाकडून खास प्रयत्न करण्यात येत होते. या प्रकल्पाला मंजुरी मिळावी, यासाठी पंतप्रधान कार्यालयाकडेही प्रस्ताव पाठविण्यात आला होता.
या प्रकल्पानुसार ओव्हल मैदान ते महालक्ष्मीपर्यंत ही रेल्वे भूमिगत असणार आहे. त्यानंतर महालक्ष्मी ते सांताक्रूझ आणि अंधेरी ते वसई रोडपर्यंत ही सेवा एलिव्हेटेड असेल. सांताक्रूझ ते विलेपार्लेदरम्यान एलिव्हेटेड रेल्वेचे बांधकाम हे वेगळ्या प्रकारे करावे लागणार असल्याचे रेल्वेच्या अधिकार्‍यांनी सांगितले. सांताक्रूझ आणि विलेपार्लेदरम्यान विमान सेवा असल्यामुळे कोणताही धोका न पत्करता येथे वेगळ्या प्रकारे रेल्वे ट्रॅक उभारावा लागणार आहे.