Indian Railways News => Topic started by irmafia on Mar 24, 2013 - 00:00:37 AM


Title - मल्टीस्पेशालिटीचा मार्ग मोकळा
Posted by : irmafia on Mar 24, 2013 - 00:00:37 AM

पूर्णा येथील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला रेल्वे खात्याने हिरवा कंदील दाखविल्याची माहिती खा. गणेशराव दुधगावकर यांनी दिली. या हॉस्पिटलसाठी खा. दुधगावकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.
केंद्रीय रेल्वेअर्थसंकल्प २0१0-११ मध्ये जाहीर झाला. त्यात पूर्णा येथील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला रेल्वे खात्याने मंजुरी दिली असून पथदश्री प्रकल्पात त्याचा समावेश करावा, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयास कळविले आहे. हे हॉस्पिटल उभारणीसंदर्भात खा.गणेशराव दुधगावकर यांनी दोन वर्षांपासून पाठपुरावा सुरु केला. रेल्वे खात्याने पूर्णा येथील २६ एकर जमीन या रुग्णालयासाठी ठेवली. त्यानंतर ५९२ प्रस्तावित प्रकल्पापैकी देशातील ९१ ठिकाणी या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याचे निश्‍चित केले. यासाठी रेल्वे मंत्रालय व आरोग्य मंत्रालयाच्या उच्च अधिकार्‍यांच्या समितीने देशभरातील ११ ठिकाणी पथदश्री प्रकल्प उभारण्याचे निश्‍चित केले. त्यात पूर्णेचा समावेश आहे. रेल्वेमंत्री पवनकुमार बन्सल यांनी हे पत्र खा.दुधगावकर यांना पाठविले