Indian Railways News => Topic started by nikhilndls on Aug 02, 2013 - 15:00:24 PM


Title - रेल्वेचे वेळापत्रक कोलमडलेलेच
Posted by : nikhilndls on Aug 02, 2013 - 15:00:24 PM

नाशिकरोड/ मनमाड । मुंबई- नागपूरदरम्यान गेल्या चार दिवसांपासून विस्कळित झालेली रेल्वे वाहतूक अद्यापही पूर्वपदावर आलेली नाही. त्यातच मुसळधार पावसाने त्यात भर टाकली असून, गेल्या चार दिवसांपासून प्रवाशांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. वध्र्याजवळच्या क्षतिग्रस्त लोहमार्गाचे काम पूर्ण झाले असून, हा मार्ग लवकरच वाहतुकीसाठी सुरू होईल अशी रेल्वे प्रशासनाने केलेली घोषणा फोल ठरली. या मार्गावरची मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस लागोपाठ तिसर्‍या दिवशी रद्द झाली, तर गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेस गेल्या चार दिवसांपासून रोज किमान चार तास विलंबाने धावत आहे. याशिवाय रेल्वेचे वेळापत्रक कोलमडलेलेच सर्वदूर कोसळणार्‍या पावसामुळे परप्रांतातून मुंबईस जाणार्‍या प्रवासी गाड्या दोन ते तीन तासांच्या विलंबाने धावत आहेत.

बुधवारी 12150 पाटणा-पुणे सुपरफास्ट दोन तास, 12810 हावडा- मु्ंबई मेल दीड तास, भुसावळ- देवळाली शटल, मुजफ्फरपूर- कुर्ला पवन, अमृतसर- मुंबई पठाणकोट या गाड्याही किमान एक ते दीड तास विलंबाने धावत होत्या. नागपूरकडील गाड्या रद्द झाल्याने मुंबईहून उत्तर महाराष्ट्रात तसेच नागपूरकडे प्रवास करणार्‍या प्रवाशांचे मोठे हाल झाले.

प्रवाशांची गैरसोय  रेल्वेगाड्या उशिरा धावत असल्याने येथील प्रवाशांची गैरसोय झाली. येथील स्थानकात मुंबईकडून भुसावळकडे जाणारी पुष्पक एक्स्प्रेस तीन तास, गीतांजली सहा तास उशिराने धावत होती. भुसावळकडून मुंबईकडे येणारी गीतांजली तीन तास, शालिमार एक्स्प्रेस तेरा तास उशिराने धावत होती. राजेंद्रनगर, गोदान एक्स्प्रेस, काशी एक्स्प्रेस नाशिकरोडला निर्धारित वेळेपेक्षा दोन तास उशिराने पोहोचल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले.