| Indian Railways News => | Topic started by irmafia on May 10, 2013 - 00:00:35 AM |
Title - संतप्त व्यापाऱ्यांचा रेलरोकोPosted by : irmafia on May 10, 2013 - 00:00:35 AM |
|
|
नागपूर - स्थानिक संस्था कराच्या (एलबीटी) विरोधात व्यापारी आक्रमक झाले असून, बुधवारी (ता. 8) मोतीबाग रेल्वेस्थानकावर रेल्वेरोकोचा प्रयत्न फसल्यानंतर मध्यवर्ती रेल्वेस्थानकावर जाऊन आंदोलक व्यापाऱ्यांनी सलग दोन रेल्वे गाड्यांना रोखून खळबळ उडविली. या प्रकरणी दोन व्यापाऱ्यांना अटक करण्यात आली असून, चार जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एलबीटी रद्द झाल्याशिवाय माघार नाही, अशी ठाम भूमिका व्यापारी आणि शासनाने घेतल्याने आंदोलन चिघळू लागले आहे. |