| 'मेट्रो'च्या तंत्रासाठी ब्रिटनचा मंत्र by Mafia on 19 February, 2013 - 12:00 PM | ||
|---|---|---|
Mafia | 'मेट्रो'च्या तंत्रासाठी ब्रिटनचा मंत्र on 19 February, 2013 - 12:00 PM | |
मुंबई महानगर प्रदेशात येत्या काही वर्षांमध्ये सुमारे १५० किमींचे मेट्रो रेल्वेचे जाळे तयार होणार आहे. या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी लंडनच्या ट्रान्सपोर्ट विभागाच्या अनुभवाचा फायदा व्हावा , म्हणून सोमवारी एमएमआरडीए आणि ट्रान्सपोर्ट फॉर लंडन यांच्यात सामंजस्य करार झाला. सध्या भारतभेटीवर असलेले ब्रिटिश पंतप्रधान डेव्हिड कॅमरून हे सोमवारी मुंबईत होते. त्यांच्या शिष्टमंडळात उच्चस्तरीय व्यापारी प्रतिनिधीही आहेत. त्यापैकीच एका शिष्टमंडळाने मंत्री ग्रेगरी बार्कर यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची सह्याद्री अतिथीगृहात भेट घेतली. या बैठकीत एमएमआरडीए आयुक्त राहुल अस्थाना आणि ट्रान्सपोर्ट फॉर लंडनचे संचालक डेव्हिड वॅबोसो यांनी मेट्रोसंदर्भातील सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.एमएमआरडीएने मुंबईसाठी १५० किमींच्या मेट्रोचा आराखडा तयार केला आहे. यापैकी बहुतांश मार्ग भूमिगत आहेत. एमएमआरडीएकडे भूमिगत मेट्रोचा अनुभव नाही. मात्र ट्रान्सपोर्ट फॉर लंडनला भूमिगत रेल्वे सेवा चालवण्याचा १५० वर्षांचा अनुभव आहे. त्याचा फायदा मुंबईतील बांधकामासाठी होईल. त्यांचे अनुभव , ज्ञान आदींचे हस्तांतरण झाल्याने मुंबई आणि लंडन या दोन शहरांमधील पायाभूत सुविधाविषयक देवाणघेवाणीस चालना मिळेल , असे राहुल अस्थाना यांनी स्पष्ट केले. | ||