| एस्कलेटरचा प्रयोग यशस्वी by railenquiry on 09 July, 2013 - 03:02 AM | ||
|---|---|---|
railenquiry | एस्कलेटरचा प्रयोग यशस्वी on 09 July, 2013 - 03:02 AM | |
ठाण्यासारख्या प्रचंड गर्दीच्या स्टेशनात एस्कलेटर फार दिवस चालू शकणार नाहीत , हा समज खोटा ठरू लागला असून , तासाभरात अकराशे प्रवासी एस्कलेटरचा वापर करत असल्याचे मध्य रेल्वेच्या पाहणीत दिसून आले आहे. ठाण्यात प्रवाशांकडून मिळालेल्या उत्तम प्रतिसादामुळे आता डोंबिवली व कल्याणातही एस्कलेटर बसवण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले आहे. | ||