| एस्केलेटरच्या भूमिपूजनास हेतूपुरस्सर डावलले by riteshexpert on 24 July, 2013 - 03:00 PM | ||
|---|---|---|
riteshexpert | एस्केलेटरच्या भूमिपूजनास हेतूपुरस्सर डावलले on 24 July, 2013 - 03:00 PM | |
डोंबिवली - डोंबिवली रेल्वेस्थानकात सरकत्या जिन्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा मंगळवारी (ता. 16) झाला असला, तरी आता त्यानिमित्त वादाला तोंड फुटू लागले आहे. भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण मला न देऊन रेल्वे प्रशासनाने हेतुपुरस्सर मला डावलले, असा आरोप आमदार रवींद्र चव्हाण यांनी केला. विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना त्यांनी निषेधाचे एक पत्र दिले आहे. प्रशासनाने स्थानकातील अन्य गैरसोयींकडे दुर्लक्ष केल्यास 15 ऑगस्ट रोजी "रेल रोको' करू, असा इशाराही त्यांनी दिला आहे. | ||