| मध्य रेल्वेच्या 'छत्रछाये'ची प्रवाशांना प्रतीक्षा by Mafia on 13 July, 2013 - 12:00 PM | ||
|---|---|---|
Mafia | मध्य रेल्वेच्या 'छत्रछाये'ची प्रवाशांना प्रतीक्षा on 13 July, 2013 - 12:00 PM | |
सातत्याने वेळापत्रकाची साथ सोडून धावणाऱ्या लोकल गाडय़ा, आठवडय़ातून एकदा तरी तुटणाऱ्या ओव्हरहेड वायर आणि महिन्यातून एकदा तरी बिघडणारी सिग्नल यंत्रणा यांमुळे मेटाकुटीला आलेल्या मध्य रेल्वेच्या प्रवाशांवरील 'छत्र'ही रेल्वेने हिरावून घेतले आहे. मध्य रेल्वेच्या अनेक प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्मवरील छप्पर विविध कारणांसाठी काढण्यात आल्याने प्रवाशांना उन्हापावसाचा मारा चुकवत गाडीची प्रतीक्षा करावी लागत आहे. | ||