| मेट्रो-3 चा भुयारी मार्ग गिरगावात खडतर by puneetmafia on 13 July, 2013 - 04:00 AM | ||
|---|---|---|
puneetmafia | मेट्रो-3 चा भुयारी मार्ग गिरगावात खडतर on 13 July, 2013 - 04:00 AM | |
मुंबई - केंद्राचा हिरवा कंदील मिळाल्याने कुलाबा-वांद्रे-सांताक्रूझ या संपूर्ण भुयारी असणाऱ्या मेट्रो- 3 प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) हालचाली सुरू केल्या आहेत. एमएमआरडीएचे आयुक्त यूपीएस मदान यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी आज कफ परेड ते आरे कॉलनीपर्यंतच्या मार्गाची एका मिनी बसमधून पाहणी केली. त्या वेळी मेट्रोच्या प्रस्तावित मार्गात येणाऱ्या गिरगाव परिसरात अरुंद रस्ते असल्याने याच परिसरातील कामात मोठे आव्हान असल्याचे त्यांच्या लक्षात आले. | ||