| रेल्वेची जर्मन तंत्रज्ञानाला साद by irmafia on 20 May, 2013 - 09:00 PM | ||
|---|---|---|
irmafia | रेल्वेची जर्मन तंत्रज्ञानाला साद on 20 May, 2013 - 09:00 PM | |
मुंबई : चर्चगेट ते डहाणू आणि सीएसटी ते कर्जत/कसारा/खोपोली/पनवेलपर्यंत विस्तार असणाऱ्या उपनगरी मार्गावर ' दर तीन मिनिटांनी लोकल ', असा दावा रेल्वेतर्फे बिनधास्त केला जातो. पण त्या मार्गांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना हा दावा किती खोटा आहे हे रोज अनुभवास येत असते. मात्र , हा दावा प्रत्यक्षात आणण्यासाठी रेल्वेने आता जर्मन तंत्रज्ञानाला साद घातली आहे. एमआरव्हीसीने उपनगरी मार्गाच्या विकासासाठी हाती घेतलेल्या योजनांमधून दर तीन मिनिटांनी लोकल आणि स्वयंचलित वेळापत्रक पद्धत कार्यान्वित केली जाणार आहे. त्यासाठी जर्मनीतील अद्ययावत तंत्रज्ञानाची मदतही घेतली जाणार आहे. | ||