| रेल्वेताई रुसल्या... by railgenie on 10 July, 2013 - 06:00 AM | ||
|---|---|---|
railgenie | रेल्वेताई रुसल्या... on 10 July, 2013 - 06:00 AM | |
रेल्वेताई आज खूप रुसल्या . खरं तर रुसणं हा त्यांचा स्वभाव कधीच नव्हता . एखाद्याचं करायचं तर किती करावं हे रेल्वेताईकडून शिकावं असं म्हणायचे लोकं . लेकुरवाळी हो रेल्वे ताई अगदी . कुणाकुण्णाला म्हणून नाही म्हणाली नाही कधी ती . कुणी तिकीट काढा , कुणी नका काढू . सगळ्यांना सोबत घेऊन जाते . तिचा प्लॅटफॉर्म तर अनेकांचं हक्काचं घर . अनेक संसार तिथे बहरले , फुलले . तिचं जग म्हणजे गोकुळच जणू . कधी नव्हे ती आज रुसली . लोको पायलट गेले , समजावून आले . मेकॅनिक गेले , गार्ड गेले , टीसी गेले कुणालाच ऐकत नव्हती . सेल्फच घेत नव्हती . सुरूच होत नव्हती . | ||