| सीएसटीच्या बोरीबंदर प्रवेशद्वाराचा कायापालट | by TrustMe on 09 July, 2013 - 03:01 PM | ||
|---|---|---|
TrustMe | सीएसटीच्या बोरीबंदर प्रवेशद्वाराचा कायापालट | on 09 July, 2013 - 03:01 PM | |
मुंबई- सीएसटी स्थानकात लांबपल्ल्यांच्या गाडय़ा पकडण्यासाठी मोठय़ा प्रमाणात प्रवासी येतात. त्यांना सीएसटीच्या मुख्य प्रवेशद्वारातूनच स्थानकात यावे लागते. मात्र, ज्या प्रवाशांच्या गाडय़ा या १४ ते १८ क्रमांकाच्या फलाटांवरून सुटतात त्यांना मुख्य प्रवेशद्वारापासून फलाटावर जाण्यासाठी जवळपास एक किलो मीटरची पायपीट करावी लागते. मात्र, आताही पायपीट वाचणार आहे. कारण १८ क्रमांकाच्या फलाटाला लागून असलेल्या बोरीबंदर प्रवेशद्वाराचा मध्यरेल्वेमार्फत कायापालट केला जाणार आहे. सध्या हे प्रवेशद्वार वापरले जात असले तरी आवश्यक सुविधा नसल्याने या प्रवेशद्वाराचा हवा तसा वापर होताना दिसत नाही. मात्र, पुढील तीन महिन्यांत हे चित्र बदलणार आहे. बोरीबंदर प्रवेशद्वाराजवळ पुढील तीन महिन्यांत पार्किंग व्यवस्था, बस सेवा आणि प्री पेड टॅक्सी स्थानक उभारले जाणार आहे. त्यामुळे ज्या प्रवाशांच्या गाडय़ा १४ ते १८ क्रमांकाच्या फलाटावरुन सुटणार आहे ते थेट बोरीबंदर प्रवेशद्वारातून फलाटावर जाऊ शकतात. शिवाय या ठिकाणी खानपान व्यवस्था, तिकीट चौकशी आणि आसन व्यवस्थाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या सुविधा उपलब्ध झाल्यावर त्याचा मोठय़ा प्रमाणात वापर होईल. तसेच मुख्य प्रवेशद्वार आणि तेथे असलेली आसनव्यवस्था यावर पडणारा ताण कमी होईल,असा विश्वास मध्यरेल्वे प्रशासनाला आहे. बस सेवा आणि प्रीपेड टॅक्सी स्टँडला जागा देण्याची रेल्वेची तयारी आहे. दरम्यान या प्रवेशद्वाराजवळ उभारण्यात येणा-या पार्किंगचा फायदा पूर्व मुक्त मार्गावरून प्रवास करणा-यांनाही होणार आहे. | ||