| ए वन ! सोलापूर स्थानकाला रेल्वे मंत्रालयाकडून दर्जा by puneetmafia on 05 February, 2013 - 09:00 PM | ||
|---|---|---|
puneetmafia | ए वन ! सोलापूर स्थानकाला रेल्वे मंत्रालयाकडून दर्जा on 05 February, 2013 - 09:00 PM | |
सोलापूर- तमाम सोलापूरकरांसाठी एक अभिमानाची, आनंदाची बातमी..सोलापूर रेल्वे स्थानकाला ए वन दर्जा मिळालाय. देशातल्या आदर्श रेल्वे स्थानकात आपल्या स्थानकाची गणना झालीय. उत्पन्न आणि सोयी-सुविधांच्या उपलब्धतेचे निकष तपासून रेल्वे मंत्रालयाने हा दर्जा दिलाय. त्यानिमित्ताने आता स्थानकावर काही नवी कामेही होणार आहेत. मंत्रालयाने मध्य रेल्वेतील काही निवडक स्थानकांनाच हा ए वन दर्जा दिलाय. यात सोलापूरचाही समावेश आहे हे विशेष. रेल्वे प्रशासनाने कामांची यादी तयार करण्याचे काम सध्या सुरू केले आहे. येत्या काही दिवसांत रेल्वेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार ही कामे होणार आहेत. यासाठी 2 ते 3 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. | ||