| नांदेड-पुणे एक्स्प्रेसला जोडणार पाच जादा डबे by nikhilndls on 18 August, 2013 - 06:00 PM | ||
|---|---|---|
nikhilndls | नांदेड-पुणे एक्स्प्रेसला जोडणार पाच जादा डबे on 18 August, 2013 - 06:00 PM | |
औरंगाबाद - गतवर्षी दसरा व दिवाळीच्या सुट्यांमध्ये प्रवाशांच्या झालेल्या गर्दीमुळे यंदा दक्षिण-मध्य रेल्वेने प्रायोगिक तत्त्वावर काही रेल्वेगाड्यांना जादा डबे वाढविण्याचा निर्णय घेतला. यानुसार 1 ऑक्टोबरपासून नांदेड-पुणे एक्स्प्रेसला पाच जादा डबे जोडण्यात येणार आहे. यामुळे परळी व मनमाड मार्गे जाणाऱ्या दोन्ही गाड्यांमध्ये 360 आसनांची संख्या वाढणार आहे. नांदेडहून पुण्याला जाण्यासाठी नागरिकांना रेल्वे अधिक सोईस्कर आहे. गतवर्षी दसरा व दिवाळीच्या सणानिमित्त प्रवाशांची गर्दी पाहता रेल्वे प्रशासन एक महिना आधीच यासंबंधी पाऊले उचलत असून गाडी क्रमांक 127230, 127229 या नांदेड-पुणे एक्स्प्रेस मार्गे मनमाड या गाडीला तसेच गाडी क्रमांक 17614 व 17613 या नांदेड-पुणे मार्गे परळी या दोन गाड्यांना 1 ऑक्टोबरपासून पाच जादा डबे जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता या दोन्ही गाड्यांना प्रत्येकी 17 डबे राहणार आहेत. ऑक्टोबर महिन्यामध्ये या गाड्यांना चांगला प्रतिसाद मिळाल्यास नोव्हेंबरमध्येही पाच डब्यांचा निर्णय कायम ठेवण्यात येणार आहे. नांदेड - पुणे - नांदेड या गाडीस पाच द्वितीय श्रेणी आरक्षित डबे (स्लीपर क्लास) जोडण्यात येणार आहेत. यामुळे गाडीतील आसनक्षमता 360 ने वाढणार आहे. | ||