| एक्स्प्रेसमध्ये चढण्यासाठी साखळीखेच by railgenie on 18 May, 2013 - 09:00 AM | ||
|---|---|---|
railgenie | एक्स्प्रेसमध्ये चढण्यासाठी साखळीखेच on 18 May, 2013 - 09:00 AM | |
उन्हाळ्याची सुट्टी असल्याने सध्या रेल्वे गाड्यांना प्रचंड गर्दी असते . या गर्दीत एक्स्प्रेस सुटताना सर्वच प्रवाशांना गाडीत प्रवेश करता येतोच असे नाही . या मागे राहिलेल्या प्रवाशांनाही एक्स्प्रेसमध्ये चढता यावे यासाठी साखळी ओढून गाडी थांबवली जात आहे . मध्य रेल्वेवरील सीएसटी , टिळक टर्मिनस आणि कल्याण स्टेशनवर हे गैरप्रकार गेल्या काही दिवसांत वाढले असून त्यामुळे ' रेल्वे सुरक्षा बल ' ( आरपीएफ ) जेरीला आले आहे . हे साखळी खेचण्याचे प्रकार कसे रोखायचे , याचा प्रश्न रेल्वे पोलिसांना पडला आहे . | ||