| चीनमधून 10 रेल्वेगाड्या मुंबईत दाखल by railgenie on 13 February, 2013 - 04:00 PM | ||
|---|---|---|
railgenie | चीनमधून 10 रेल्वेगाड्या मुंबईत दाखल on 13 February, 2013 - 04:00 PM | |
मुंबई - मुंबईतील पहिल्या मेट्रो प्रकल्पाच्या पुलाचे बांधकाम 99 टक्के पूर्ण झाले असून, रेल्वेरूळ बसविण्याचे कामही 90 टक्के पूर्ण झालेले आहे. इतकेच नव्हे, तर मेट्रो सेवेचे कामकाज आणि देखभालीसाठी आवश्यक असलेला कर्मचारीवर्ग भरण्याचे कामही पूर्ण झालेले असून, त्यांना सध्या प्रशिक्षण दिले जात आहे. याशिवाय आतापर्यंत 10 नव्या कोऱ्या करकरीत मेट्रो गाड्या मुंबईत दाखल झालेल्या असून, मार्चअखेरपर्यंत आणखी सहा गाड्या दाखल होणार आहेत, अशी माहिती "मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड'च्या (एमएमओपीएल) सूत्रांनी "सकाळ'ला दिली. त्यामुळे वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मार्गावरील 11.40 किलोमीटरची ही पहिली मेट्रो सेवा आता दृष्टिपथात आल्याचे संकेत मिळाले आहेत. | ||